[go: nahoru, domu]

Jump to content

धनुर्वात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा १९:३६, १९ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)


धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो नावाच्या जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात व त्यामुळे सर्वात आधी तोंडाच्या जबडय़ाचे स्नायू आखडले जातात. नंतर त्यांचा परिणाम हळूहळू शरीरभर व्हायला सुरुवात होते. धनुर्वाताचे चार प्रकार आढळतात.

क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो जीवाणु[संपादन]

मातीत राहणाऱ्या या जीवाणुचा संसर्ग जखमांना झाल्याने धनुर्वात हा संसर्गजन्य रोग होतो. ह्याचे कारण ठरणाऱ्या स्पोरच्या स्वरूपातील क्लॉस्ट्रिडियम बॅक्टिरियमची मातीमध्ये पुष्कळ वर्षे जगण्याची क्षमता असते. मातीत, वातावरणात, कुठल्याही गंजलेल्या वस्तूच्या गंजात. जखमेशी या विषाणूचा संपर्क झाल्यास त्याचा हल्ला थेट स्नायूंवर चढवतो. त्यामुळे स्नायू वाकले जातात. कधी कधी ते आतल्या बाजूला अधिक वाकले जातात, त्यांना धनुष्याचा आकार प्राप्त होऊन जडत्त्व प्राप्त होतं. हे जंतू अन्न पाण्याबरोबर पोटात गेले तर काही होत नाही, पण जखमेत गेल्यास धनुर्वात होऊ शकतो.

क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो जीवाणुचे दोन प्रकार आहेत.
  1. स्पोरच्या स्वरूपात (डॉरमंट)
  2. व्हेजिटेटिव्ह सेल (जो संख्या वाढवितो).

प्रकार[संपादन]

  1. सामान्य धनुर्वात संपूर्ण सांगाड्याच्या स्नायुंना प्रभावित करू शकतो. चार ही प्रकारातील हा सर्वांत जास्त गंभीर आहे.
  2. स्थानिक धनुर्वात जखमेच्या किंवा जीवाणुचा संसर्ग झालेल्या जखमेजवळील स्नायुंना कमकुवत करतो.
  3. सेफलिक टिटॅनस डोक्याला इजा झाल्यावर किंवा कानांत संसर्ग झाल्यास, आधी चेहऱ्याच्या पुष्कळशा स्नायुंना प्रभावित करतो (एक किंवा दोन दिवसांत).
  4. निओनेटल धनुर्वात साधारण धनुर्वातासारखाच असतो पण हा फक्त १ महिन्याच्या आतील अर्भकास (म्हणूनच ह्याला निओनेटल म्हणतात) प्रभावित करतो. विकसित देशांमध्ये असे प्रकार कमी होतात.

प्रतिबंध[संपादन]

धनुर्वात होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी धनुर्वात विरोधी लस देणे गरजेचे आहे.


संदर्भ[संपादन]